मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुला विरोधात ठाकरेंची महिला रणरागिणी, कल्याण-डोंबिवलीत दिग्गज नेत्यांच्या सभा जोरात .

Kalyan And Bhiwandi Lok Sabha : कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वैशाली दरेकर तर भिवंडीमधून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात बाळ्या मामा म्हात्रे अशी लढत होत असल्याने मतदारसंघात दिग्गजांच्या सभा जोरात होत आहे

कल्याण डोंबिवली : चौथ्या टप्प्यातील निवडणूक जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. दरम्यान कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत तर भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत असल्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी लोकसभेला जास्त महत्व आले आहे. येत्या १२ मे, १३ मे आणि १५ मे रोजी दोन्ही लोकसभा मतदार संघात दिग्गज नेत्याच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत येणार असून उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या सभा होणार आहेत.

श्रीकांत शिंदे यांची मागणी, राज ठाकरे यांची सभा होणार

महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेत आहेत. कल्याण लोकसभेत एक सभा घेण्याचे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांच्या मागणीवरून राज ठाकरे यांनी दिले असून येत्या १२ मे रोजी डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत, या सभेला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

ठाकरे-पवारही सभा घेणार
तर १३ मे रोजी डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले. दुसरीकडे १२ मे रोजी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र (बाळ्यामामा) म्हात्रे प्रचारार्थ शरद पवार हे स्वतः शहापूर आणि कल्याणमध्ये सभा घेणार आहेत.

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपील पाटील यांच्या विरुध्द राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे, नीलेश सांबरे यांच्या बरोबर लढत होणार आहे. हा गड सहजासहजी राखणे भाजपला यावेळी जड जात असल्याने अखरेच्या टप्प्यात मोदी पंतप्रधान येत्या १५ तारखेला कल्याण पश्चिमेत सभा घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय घमासान पाहिला मिळेल. आताची सर्वात मोठी बातमी मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; संजय राऊतांचा हल्लाबोल

Leave a Comment